‘प्रथम पुरुष’ : संवेदनशील विषयावरचं ‘इंटेन्स’, अंगावर येणारं हे नाटक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवं…
‘प्रथम पुरुष’च्या निमित्ताने पुन्हा एकदा आजची तरुणाई, कौटुंबिक हिंसा, किळसवाणे स्पर्श, स्त्री-पुरुष नातेसंबंध, बलात्कार, स्पर्श, पौरुषाच्या खोट्या कल्पना, अशा अनेक विषयांवर डोक्यात मोहोळ उठलं. विचार करायला लावणारं हे नाटक आजवर ‘लोकाश्रया’वर तरलं आहे. ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवं. लेखक आणि दिग्दर्शक संकेत सीमा विश्वास यांनी नाटक फार सुंदर लिहिलं आहे आणि तितकंच उत्तम बांधलं आहे.......